Friday, May 7, 2010

एक मार्मिक प्रश्न ...

यथा काष्ठं च् काष्ठं च् |
समेयातां महोदधौ ||
समेत्यच व्यपेयातां |
तत्द्वभूत्समागम:||

अगदी लहानपणी हे संस्कृत सुभाषित एका पुस्तकात वाचल्याचे आठवते. ते मनःपटलावर अगदी कायमचे कोरल्या गेले. त्याचा भावार्थ असा - ज्याप्रमाणे समुद्रात दोन लाकडे एकत्र येतात आणि एकत्र येवून दूर जातात त्याप्रमाणे प्राणीमात्रांचा सहवास असतो.

किती सहज गोष्ट आहे... पण प्रत्यक्ष जीवनात प्रचंड गुंतागुंतीतून का जावे लागते कळतच नाही. प्रत्येक व्यक्तीला एक दिवस दूर जाणे आहेच... मग ते दूर जाणे अंतराला अनुसरून असो किंवा काळाला अनुसरून!
आपण मात्र सगळ्या छोट्या छोट्या क्षणांना, गोष्टीना अगदी घट्ट कवटाळून बसतो. जणू काही आपण ह्या आपल्या मालकी हक्कांच्या क्षणांचे संरक्षण करीत असतो.
हो ..म्हणजे काय केलेच पाहिजे...करायला नको? असा सामान्य दृष्टीकोन असतो.
प्रत्यक्षात, आयुष्यात ज्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत त्या जवळपास सगळ्याच अदृष्ट स्वरूपाच्या असल्याचे आढळते. उदाहरणच द्यायचे झाले तर ...प्रेम, गोड आठवणी, सुगंध, श्रद्धा,नीती, दया, आत्मविश्वास, यादी बरीच मोठी आहे. तर ह्या गोष्टी हातात पकडून ठेवू शकत नाही किंवा कमी... जास्त मोजुही शकत नाही. मग त्यांना कवटाळून बसण्याचा अट्टाहास का?

--------------------------------------******--------------------------------------

4 comments:

  1. सुंदर लेख! पण ह्या गोष्टींशिवाय आयुष्य कंटाळवाणं होइल. ये जीवन है... इस जीवन का....गाण्याटाइप असतं सगळं. (बाय द वे... चक्का घुमने लग गया है!) Keep writing

    ReplyDelete
  2. Thanks! Actually this blog page should have a wall like orkut/facebook...its silly to reply to ur comment on my blog itself.:-s

    ReplyDelete
  3. Look at the positive side.... The readers got to visit your blog more often to check the reply to their comments ;-)

    ReplyDelete
  4. अभिलाषशी सहमत. :)
    नेहा, लेख आवडला. जन्माला जीव आला त्याला मृत्यू अपरिहार्यच आहे म्हणून लगेचच कोणी मरून तर घेत नाही ना गं. बस तसेच आहे.

    ReplyDelete