Thursday, May 6, 2010

माझी स्वप्ने ...

नवीन फोन्ट इन्स्टाल केला तो चांगला चालतो की नाही ते बघायचे होते म्हणून हा लेख सुरु केला. आत्ताच एका मित्रासोबत बोलत असताना मी माझ्या विचित्र स्वप्ना बद्दल त्याला सांगत होते. तो ते ऐकून जरा चक्रावला आणि मला ही कल्पना सुचविली. माझ्या पहिल्या ब‍लॉग मध्ये मी माझ्या स्वप्नांबद्दल लिहिले आहेच म्हणा, पण हे जरा वेगळे प्रकरण आहे.

मला ना नेहमी एकाच स्वरूपाचे स्वप्न पडते. मी अश्या एका खूप मोठ्या मंदिरात आहे आणि मंदिराच्या गाभार्यात कुठल्यातरी देवाची मूर्ती आहे, नेमकी कुणाची ते दिसत नाही. मात्र एकदम सुरेख रांगोळी, सुवासिक अगरबत्त्या, पूजेची तयारी, फळे, फुले अगदी सगळे दिसते.

ह्याच्या पुढचा भाग मला नेहमी विचारात पाडतो. तो असा कि त्या मंदिराच्या भव्य गाभार्यात एक गरगरीत गोल पोट असलेला सोवळ्यातला पुजारी जो मला दिसतो ते पात्र म्हणजे मी असते. असे का? असा "जेंडर मी लोचा" माझ्याच स्वप्नात यायचा होता. लोकांना किती छान स्वप्ने पडतात. कुणी कुठले पारितोषिक घेतं, कुणी आयुष्यात यशस्वी होतय. आणि मी ...शी कुणाला बोलायाची पण सोय नाही हो... हे म्हणजे ..मला शब्दच सुचत नाही. मी आणि पुरुष अवतारात...कठीण आहे एकूण सगळच .

ह्याबद्दल ज्या कुणाला सांगितले तो खो-खो हसत सुटला. म्हणे तुला अशी सुप्त इच्छा बिच्छा होती कि काय पुजारी व्ह्यायची. काय बोलणार ह्यावर?
काय करावे काही सुचेना. त्या दिवशी एका दुकानात एक शक्ती ग्वैन (Shakti Gwain) नावाच्या लेखिकेचे सुंदर पुस्तक दिसले. " Creative Visualization" असे त्या पुस्तकाचे नाव. दोन चार पान चाळून बघितली तर पूर्ण वाचायची इच्छा झाली. त्यात अल्फा आणि बेटा (alpha and beta) अश्या मेंदूच्या दोन अवस्था सांगितल्या आहेत. सूक्ष्म आणि स्थूल असे मनाचे दोन भाग आपण नेहमी ऐकतो (conscious and subconscious) तर ह्या सूक्ष्म मनातली चलबिचल आपल्या सभोवतालच्या परिस्थितीला जास्त प्रभावीत करते आणि जर वरचे वर आपण बेटा अवस्थेत जो विचार करतो तसे आपल्याला स्वप्न पडतात असे काहीसे त्या पुस्तकात आहे.

मी आता रोज रात्री बेटा अवस्थेत जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करून माझ्या स्वप्नातल्या "जेंडर लोचा" ठीक करण्याचा प्रयत्न करत असते.

So far...no luck...पण माझे प्रयत्न अगदी युद्ध पातळीवर चालू आहेत.

समाप्त:

7 comments:

  1. नविन ब्लॉगबद्दल अभिनंदन नेहा!

    ReplyDelete
  2. धन्यवाद! अभिलाष.

    ReplyDelete
  3. नविन ब्लॉगसाठी मनापासून शुभेच्छा नेहा! तुझं स्वप्न जरा विचीत्र आहे, पण लिहिण्याची शैली छान सरळ सोपी आहे. :))

    Keep up the work and All the best!!

    ReplyDelete
  4. Thanks..didn't expect any comment so soon. Some surprises r good I guess!

    ReplyDelete
  5. हा हा. मस्त.. स्वप्नातला 'जेंडर लोचा' सॉल्व्ह झाला की नवीन पोस्ट टाक :P

    ReplyDelete
  6. प्रयत्ने वाळू चे कण रगडीता...असे काहीसे चालू आहे.. बघुया..:)thanks for visit!

    ReplyDelete
  7. काय? लकने साथ दिली का? जेंडर लोचा सोडवलास की आता नवीनच घोळ घातलास... :D. सही आहे.

    ReplyDelete